आयएएस संजय सेठी(IAS SANJAY SETHI) ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’

नमस्कार मित्र आणि मैत्रणीनो आज आपण वाचणार आहोत Ias Sanjay Sethi Biography in Marathi लेख, चला तर मग सुरु करूया. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 1992 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी संजय सेठी हे 30 हून अधिक वर्षाच्या उत्कृष्ट कारकिर्दीतसाठी ओळखले जातात. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र आणि मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेतलेले सेठी यांनी आपल्या राज्याच्या विकासासाठी प्रभाविपने केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जिल्हा पातळीपासून ते मंत्रालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्वाची पदे भूषवली आहेत.
सुरुवातीला जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त (ठाणे, नागपूर) आणि MIDC चे CEO म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण विकास, 24/7 पाणीपुरवठा प्रकल्प आणि औद्योगिक सुलभतेला मोठे प्राधान्य दिले. विशेषतः डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT/JNPA) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय ठरले. त्यांच्या कार्यकाळात बंदराची क्षमता वाढली आणि भारताच्या सागरी व्यापारला जागतिक पातळीवर नवी गती मिळाली.
प्रशासकीय सुव्यवस्था, ऊर्जा दक्षता आणि नगरविकासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना “क्रिसील पुरस्कार” आणि राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक सन्मानानी गौरविण्यात आले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) अध्यक्ष म्हणून कार्यरत असून प्रवाशांच्या सुविधा आणि एसटीच्या आधुनिकीकरणासाठी कार्यरत आहेत. एक अभ्यासू, शांत आणि निर्णयक्षम अधिकारी म्हणून आयएएस संजय सेठी (IAS SANJAY SETHI) यांचा संपूर्ण प्रवास भावी प्रशासकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतो.
आयएएस संजय सेठी(IAS SANJAY SETHI) ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’, ‘महत्त्वाचे कार्य’ आणि जॉइनिंग देट
१. प्रारंभिक जीवन, मूळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी (Early Life & Background)
जन्म आणि मूळ:-
संजय सेठी यांचा जन्म 23 सप्टेंबर 1967 रोजी झाला. त्यांचे मूळ राज्य हरियाणा असून, ते यूपीइससीच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षात थेट भरती झालेले (DIRECT RECRUIT) अधिकारी आहेत.
व्यक्तिमत्त्व:-
ते प्रशासकीय वर्तुळात एक अभ्यासू, शांत आणि धोरणात्मक निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
२. शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
संजय सेठी यांनी उच्च शिकणात अत्यंत प्रतिष्टीत पदव्या घेतल्या आहेत. त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए (M.A ECONOMICS) आणि एम.फील (M.PHIL IN ECONOMICS) पूर्ण केले. याशिवाय त्यांनी जगातील अत्यंत प्रतिष्टीत अशा लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स (LONDON SCHOOL OF ECONOMICS-LSE) मधून मॅनेजमेंटमध्ये पदवी/मास्टर्स शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या प्रगत आर्थिक ज्ञानाचा फायदा त्यांच्या कारकिर्दीतील धोरणात्मक निर्णय घेताना झाला आहे.
३. प्रशासकीय कारकीर्द आणि सुरुवातीची पदे (Early Career & District Postings)
1992 च्या बॅचचे अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर संजय सेठी यांनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमि (LBSNAA मसुरी) येथून प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनातर्गत विविध जिल्ह्यात आणि विभागात काम केले:
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी:-
त्यांनी सोलापूर, कोल्हापूर सहाय्यक जिल्हाधिकारी आणि जव्हार (ठाणे) येथे प्रकल्प अधिकारी (ITDP) म्हणून आदिवासी विकासासाठी काम केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO):-
त्यांनी नांदेड आणि इतर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे CEO म्हणून ग्रामीण विकासाच्या योजना यशस्वीपने राबवल्या.
जिल्हाधिकारी:-
त्यांनी धुळे आणि वाशीम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्था आणि महसूल प्रशासनात उत्तम कामगिरी केली.
४. नगरविकास आणि महानगरपालिका आयुक्त पदे (Urban Development & Municipal Roles)
संजय सेठी यांनी महाराष्ट्रातील महत्वाच्या नागरी आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रशासकीय धुरा सांभाळली आहे.
महानगरपालिका आयुक्त:-
आयएएस संजय सेठी(IAS SANJAY SETHI) यांनी ठाणे आणि नागपूर सारख्या महत्वाच्या शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त म्हणून काम पाहिले.
ठाणे आयुक्तपदाची कामगिरी:-
ठाण्याचे आयुक्त असताना त्यांनी प्रशासकीय सुव्यवस्थेत उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यासाठी त्यांना नामांकित पुरस्कारही मिळाले.
नागपूरचा पाणीपुरवठा प्रकल्प:-
नागपूरमध्ये त्यांनी “24/7 पाणीपुरवठा” (24/7 WATER 💦 SUPPLY) हा महत्वाकांक्षी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प यशस्वीरित्या रबावला.
एमएमआरडीए (MMRDA):-
आयएएस संजय सेठी(IAS SANJAY SETHI) यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास (MMRDA) मध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून मुंबईच्या मेट्रो व इतर वाहतूक पायाभूत प्रकलपामध्ये योगदान दिले.
५. उद्योग, ऊर्जा आणि एमआयडीसी (MIDC & Industrial Sector)
विकास आयुक्त (उद्योग):-
त्यांनी महाराष्ट्र शासनाचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त म्हणून काम पहिलं, ज्यामुळे राज्यात औद्योगिक गुंतवणूकीला चालना मिळाली.
एमआयडीसी (MIDC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO):-
में 2016 ते सप्टेंबर 2018 या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) CEO म्हणून जबाबदारी सांभाळली.या काळात त्यांनी उद्योगासाठी सुलभ वातावरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
ऊर्जा क्षेत्र:-
आयएएस संजय सेठी(IAS SANJAY SETHI) त्यांनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MSETCL) चे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणूनही ऊर्जा क्षेत्रात काम केले.
६. जेएनपीटी (JNPT) चे अध्यक्षपद (Chairman of JNPA)
आयएएस संजय सेठी(IAS SANJAY SETHI) यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाच्या टप्प्यापैकी एक म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT / JNPA) चे अध्यक्षपद होय. डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत त्यांनी या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात न्हावा शेवा (JNPT) बांदराचा कारभार अधिक आधुनिक करण्यात आला, कंटेनर हाताळणीची क्षमता वाढवली गेली आणि देशाच्या सागरी व्यापाराला मोठी गती मिळाली कोविड महामारीटच्या कठीण काळातही त्यांनी पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.
७. उच्च पदस्थ जबाबदाऱ्या आणि वर्तमान पदे (Recent Postings & Current Role)
गृह आणि परिवहन विभाग:-
JNPT मधील यशस्वी कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनात अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन आणि बंदर, गृह विभाग) म्हणून काम पाहिले.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय:-
त्यांनी केंद्र शासनामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे (NCM) सचिव म्हणूनही अल्पकाळ सेवा दिली.
सध्याची जबाबदारी:-
फेब्रुवरी २०२५ पासून ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC – ST Mahamandal) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या पदावर ते एसटी महामंडळाच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
८. पुरस्कार आणि सन्मान (Awards and Achievements)
आयएएस संजय सेठी(IAS SANJAY SETHI) यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीय करण्यात आले आहे:
क्रिसिल पुरस्कार (CRISIL Award for Excellence in Urban Governance):-
ठाण्याचे महानगरपालिका आयुक्त असताना उत्कृष्ट नगर प्रशासनासाठी मिळाला.
राष्ट्रपती पुरस्कार (President’s Award for Energy Efficiency):-
ऊर्जा बचतीमधील उत्कृष्ट कार्यासाठी.
राज्य शासनाचा पुरस्कार:-
शहरी स्वच्छता आणि प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य सरकारतर्फे सन्मान. याशिवाय, सार्वजनिक जीवनातील उत्कृष्ट योगदाणासाठी त्यांना “लोकमत महाराष्ट्राचे मोस्ट स्टायलिश अकॉर्डस” (3017) मध्येही सन्मानित केले गेले आहे.
निष्कर्ष (Conclusion):-
आयएएस संजय सेठी (IAS SANJAY SETHI) हे एका दूरदर्शी प्रशासकाचे उत्तम उदाहरण आहेत. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सचे शिक्षण आणि तीन दशकाहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रात (महसूल, उद्योग, नागरी विकास, बंदर आणि परिवहन) बजावलेली उत्कृष्ट कामगिरी यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा हा प्रवास भावी प्रशासकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेलं.
आयएएस संजय सेठी यांच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न (FAQs)
आयएएस संजय सेठी हे मूळचे कुठले आहेत आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?
संजय सेठी हे मूळचे हरियाणा राज्याचे आहेत. त्यांचे शालेय व उच्च शिक्षन व उच्च माध्यमावर्गीय शैक्षणिक वातावरणात झाले. ते UPSC नागरी सेवा परीक्षदरम्यान ठेव भरती झालेले (DIRECT RECRUIT) आयएएस अधिकारी आहेत.
त्यांनी शिक्षण कोठून पूर्ण केले आहे?
त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए आणि एम. फील.(M.A. & M.PHIL IN ECONOMICS) पूर्ण केले आहे. याशिवाय, त्यांनी जगातील अत्यंत प्रतिष्टीत मानल्या जाणाऱ्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स (LONDON SCHOOL OF ECONOMICS-LSE) मधून मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेतले आहे.
संजय सेठी हे कोणत्या बॅचेसचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत?
ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) 1992 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत कोणती महत्त्वाची पदे भूषवली आहेत?
त्यांनी आपल्या 30 हून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत, ज्यामध्ये प्रमुख आहेत, धुळे व वाशीम जिल्हाचे जिल्हाधिकारी, ठाणे आणि नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT/JNPA) चे अध्यक्ष, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन आणि बंदर विभाग, महाराष्ट्र शासन) सध्या ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC – ST MAHAMANDAL) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांचे कोणते कार्य सर्वाधिक गाजले?
नागपूरमध्ये महानगरपालिका आयुक्त असताना त्यांनी “24/7 पाणीपुरवठा” (24/7 WATER 💦 SUPPLY) हा महत्वाकांक्षी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प अत्यंत यशस्वीरित्या राबवला, ज्याची देशभरात चर्चा झाली होती.
JNPT (न्हावा शेवा बंदर) चे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाल कसा राहिला?
डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2024 या काळात त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात बंदराची कंटेनर हाताळणी क्षमता वाढली, कारभारात आधुनिकीकरण झाले आणि कोरोना महामारीच्या कठीण काळातही देशाची सागरी पुरवठा साखळी सुरळीत राहण्यात त्याचे मोठे योगदान होते.
त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत?
उत्कृष्ट प्रशासकीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, जसे कि उत्कृष्ट नगर प्रशासनासाठी “क्रिसील पुरस्कार” (CRISIL AWARD 🎖️🏅), ऊर्जा बचतिमधील उत्कृष्ट कार्यासाठी “राष्ट्रपती पुरस्कार” शहरी स्वच्छता आणि विकासातील योगदाणाबद्दल राज्य शासनाचे विविध सन्मान.
संजय सेठी हे त्यांच्या कोणत्या गुणविशेषोंसाठी ओळखले जातात?
ते एक अभ्यासू, शांत, धोरणात्मक निर्णय घेणारे आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. अर्थशास्त्रातील त्यांच्या प्रगत ज्ञानाचा उपयोग ते पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी अत्यंत प्रभाविपने.
1 thought on “IAS Sanjay Sethi Biography in Marathi 2026 | वय, जन्म, शिक्षण, UPSC रँक, IAS प्रवास, कुटुंब, करिअर आणि संपूर्ण जीवन परिचय”