Ias Divyank Gupta Biography in Marathi | AIR 21 UPSC 2024 | Education, Age, Family

Table of Contents

IAS Divyank Gupta Biography: यांचे जीवन, शिक्षण, IIT Kanpur, UPSC AIR 21, IPS ते IAS प्रवास, महाराष्ट्र कॅडर आणि यशोगाथा

IAS Divyank Gupta Biography in Marathi AIR 21 UPSC 2024 Education, Age, Family

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत Ias Divyank Gupta Biography in Marathi लेख तर चला मग सुरु करूयात आणि शेयर करायला विसरू नका. भारतातील सर्वात प्रतिष्टीत नगर सेवापैकी एक असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) स्थान मिळवण्यासाठी अनेक विध्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. काही विध्यार्थी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात, तर काहींना अनेक अपयशाचा सामना करून आपले स्वप्न पूर्ण करावे लागते.

 

अशाच प्रेरणादायी प्रवासापैकी एक म्हणजे दिव्यांग गुप्ता यांचा प्रवास. IIT Kanpur मधून अभियांत्रिकीचे शिक्षण, उवसच परीक्षेतील सुरुवातीचे अपयश, IPS सेवेत प्रवेश आणि त्यानंतर पुन्हा प्रयत्न करून UPSC 2024 मध्ये ऑल इंडिया रँक 21 मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास विध्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण उदाहरण आहे. या Divyank Gupta IAS Biography in Marathi लेखमध्ये आपण IAS दिव्यांग गुप्ता यांचे प्रारंभीक जीवन, कुटुंब, जन्म, शिक्षण, कॉलेज, UPSC प्रवास, परीक्षा रणणिती, यश आणि त्यांच्याबद्दल वारंवार विचारले जानारे प्रश्न सविस्तर पाहणार आहोत.

 

Divyank Gupta IAS Biography: यांचा जीवनप्रवास, शिक्षण, UPSC तयारी, AIR 21 आणि यशोगाथा

 

1. प्रारंभिक जीवन आणि जन्म (Early Life)

दिव्यांग गुप्ता यांचा जन्म 10 जुलै 1998 रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर येथे झाल्याचे काही न्यूज वेबसाईट सांगतात. त्यांचे बालपण आणि शालेय जीवन कानपुरमध्ये गेले.

 

त्यांचे वडील व्यवसाय करतात. ते एक जनरल स्टोअर चालवत असल्याची माहिती एका मुलाखतीत प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या आई गृहनी आहेत. कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या शिक्षणाला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला पाठिंबा दिला.

 

दिव्यांग यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांनी शालेय शिक्षणामध्ये चांगली कामगिरी केली आणि पुढे अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी पारंपरिक नोकरीला संधीपेक्षा नागरी सेवेला प्राधान्य दिले. समाजासाठी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली, या उद्देशाने त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

 

2. कुटुंबाची माहिती (Family Background)

दिव्यांग गुप्ता यांच्या कुटूंबाने त्यांच्या UPSC प्रवासात महत्वाची भूमिका बजावली.

 

वडील:-

व्यवसायाने व्यापारी, कानपुरमध्ये जनरल स्टोअर चालवत असल्याचे वृत्त आहे.

 

आई:-

दिव्यांग गुप्ता यांच्या आई गृहनी आहेत.

 

भाऊ:-

त्यांच्या भावाने UPSC तयारीच्या कठीण काळात त्यांना मानसिक आधार दिल्याचे दिव्यांग गुप्ता यांनी मुलाखतीत सांगितले आहे. UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मानसिक ताण, अपयश आणि अनिश्चितता याचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कुटुंबाचा पाठिंबा महत्वाचा ठरतो. त्यांच्या प्रवासात कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनाचा उल्लेख त्यांनी स्वतः केला आहे.

 

3. शालेय शिक्षण (School Education)

दिव्यांग गुप्ता यांनी कानपुरमधील Shree Sanatan Dharma Education Centre येथे शालेय शिक्षण घेतल्याचे प्रकाशित न्यूज पेपर मध्ये नमूद आहे. त्यांनी दहावीमध्ये 10 CGPA मिळवल्याची माहिती उपलब्ध आहे. बारावीमध्ये त्यांनी 88.2 टक्के गुण मिळवले होते.

 

शालेय शिक्षणादरम्यान त्यांनी गणित आणि विज्ञान या विषयामध्ये विशेष लक्ष दिले. पुढे IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी JEE परीक्षेची तयारी केली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील सातत्यामुळे त्यांना देशातील प्रतिष्टीत अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश मिळवता आला.

 

4. IIT Kanpur मधील शिक्षण (College Education)

दिव्यांग गुप्ता यांनी Indian Institute of Technology Kanpur म्हणजेच IIT Kanpur येथे प्रवेश मिळवला. त्यांनी Chemical Engineering या शाखेमधून Bachelor of Technology (B.Tech) पदवी पूर्ण केली. त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्याची माहिती अव्हेलेबल आहे.

 

कॉलेजमधील शिक्षणाबरोबरच ते विविध उपक्रमामध्ये सहभागी होत असत. त्यांच्या कॉलेजमधील काही महत्वाच्या जबाबदाऱ्या. Entrepreneurship सेल मध्ये सिनियर एक्सकटीव म्हणून काम. स्टुडन्ट प्लेसमेंट ऑफिस मध्ये कंपनी Coordinator म्हणून काम.

 

अंतरागणी या कॉलेजच्या सांस्कृतिक मोहोत्सवात सेक्रेटरी म्हणून जबाबदारी. विध्यार्थ्यामधील नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य विकसित करणे. IIT मधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासमोर चांगल्या कॉर्पोरेट नोकरीच्या संधी होत्या. मात्र त्यांनी कॉम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी न होता UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

 

5. UPSC परीक्षेची तयारी कशी सुरू केली?

IIT KANPUR मधून पदवी पूर्ण केल्यानंतर दिव्यांग गुप्ता यांनी UPSC Civil Services Examination ची तयारी सुरु केली. UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षापैकी एक आहे. या परीक्षामध्ये प्रिलीम्स, मैन्स आणि इंटरव्हिव असे तीन प्रमुख स्टेप असतात.

 

दिव्यांग यांनी तयारी करताना अभ्यासक्रम समजून घेणे, मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवणे, टेस्ट सिरीज आणि उल्लेखनीय यावर भर दिला. त्यांच्या तयारीमधील महत्वाचे मुद्दे:

 

  • 1. UPSC चा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे.
  • 2. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे.
  • 3. नियमितपणे सराव प्रश्न सोडवणे.
  • 4. Mains साठी उत्तरलेखणाचा सराव करणे.
  • 5. चालू घडामोडीचा अभ्यास करणे.
  • 6. नियमित Revision करणे.
  • 7. Mock Interview देऊन मुलाखतीची तयारी करणे.
  • 8. त्यांनी गणित हा वैकल्पिक विषय निवडला
  • 9. अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असल्यामुळे गणित विषयांशी त्यांची चांगलीच ओळख होती.

 

6. UPSC मधील पहिले अपयश

दिव्यांग गुप्ता यांचा UPSC प्रवास सुरुवातीपासून यशस्वी नव्हता. त्यांच्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली होती; मात्र अंतिम यादीत त्यांचे नाव आले नाही. पुढील प्रयत्नात त्यांना Prelims परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही.

 

या अपयशानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या अभ्यासातील चुका शोधल्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रवासातून विध्यार्थ्यांना एक महत्वाचा संदेश मिळतो: UPSC परीक्षेत अपयश आले तरी योग्य नियोजन, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर पुन्हा प्रयत्न करता येतो.

 

7. UPSC AIR 357 आणि IPS सेवेत निवड

दिव्यांग गुप्ता यांनी UPSC Civil Services Examination मधील पुढील प्रयत्नात All India Rank 357 मिळवली. या यशामुळे त्यांची Indian 🇮🇳 Police Service (IPS) मध्ये निवड झाली. IPS सेवेमध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी हैद्राबाद येथील Sardar Vallabhbhai Patel National Police Academy मध्ये प्रशिक्षण घेतले.

 

IPS अधिकारी म्हणून सेवा करत असतानाही त्यांनी IAS OFFICER होण्याचे ध्येय कायम ठेवले. त्यांच्या मते पोलीस सेवेबरोबरच प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामामध्ये धोरणात्मक आणि प्रत्यक्ष पातळीवर काम करण्याची संधी त्यांना आकर्षित करत होती.

 

8. UPSC 2024 मध्ये AIR 21 मिळवून IAS होण्याचे स्वप्न पूर्ण

दिव्यांग गुप्ता यांच्यासाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्वाचे ठरले. IPS सेवेत असतानाच त्यांनी पुन्हा UPSC परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. नोकरीची जबाबदारी आणि UPSC चा अभ्यास यांचा समतोल राखत त्यांनी तयारी सुरु ठेवली. शेवटी UPSC Civil Services Examination 2024 च्या अंतिम निकालात त्यांनी ALL India 🇮🇳 Rank 21 मिळवली. UPSC 2024 निकालातील गुण ( मेन गुण) 825 1750 पैकी, इंटरव्हिव्ह गुण 275 पैकी 190 आणि एकूण गुण 1015, 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 21 मिळवला.

 

9. UPSC वैकल्पिक विषय (Optional Subject)

दिव्यांग गुप्ता यांनी UPSC MAINS मध्ये Mathematics हा वैकल्पिक विषय निवडला होता. त्यांची अभियांत्रिकीची शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळे गणित विषयाची निवड त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरली. त्यांनी गणिताच्या सरावासाठी नियमित प्रश्न सोडवले आणि टेस्ट सिरीजमध्ये सहभाग घेतला.

 

त्यांच्या पहिल्या UPSC यशाच्या तयारीबद्दल दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी Prelims साठी सुमारे 10.000 हजार प्रश्न सोडवल्याचे सांगितले होते. General Studies साठी 25 टेस्ट आणि Optional साठी 40 टेस्ट दिल्याचाही उल्लेख केला होता. मुलाखतीसाठी त्यांनी मित्रांसोबत 70 ते 80 Mock Interviews चा सराव केला होता, असे त्यांनी सांगितले.

 

10. महाराष्ट्र IAS कॅडर मिळाले

UPSC 2024 मध्ये AIR 21 मिळवल्यानंतर दिव्यांग गुप्ता यांची IAS सेवेसाठी निवड झाली. 2025 च्या IAS CADRE ALLOCATION नुसार त्यांना महाराष्ट्र कॅडर देण्यात आले.

 

दिव्यांग गुप्ता यांच्या सेवा प्रवासातील महत्त्वाचे टप्पे:

  • IIT KANPUR मधून B. TECH पूर्ण
  • UPSC परीक्षेची तयारी.
  • IPS सेवेत निवड.
  • IPS प्रशिक्षण पूर्ण.
  • पुन्हा UPSC परीक्षा देण्याचा निर्णय.
  • UPSC 2024 मध्ये AIR 21.
  • 2025 मध्ये IAS सेवेसाठी निवड.
  • महाराष्ट्र कॅडरचे वाटप.

 

11. IAS अधिकारी म्हणून प्रशिक्षण आणि सध्याची नियुक्ती

IAS सेवेमध्ये निवड झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मसुरी येथील Lal Bahadur Shastri National Academy of Administration (LBSNAA) येथे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांक गुप्ता यांची 2025 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरमधील अधिकरी म्हणून नोद आहे. उपलब्ध सेवा नोंदीनुसार 2026 मध्ये त्यांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर बीड येथे Super Numerary Assistant Collector म्हणून नियुक्तीची नोंद आहार. ही माहिती बदलीनुसार बदलू शकते.

 

12. दिव्यांक गुप्ता यांच्याकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे?

दिव्यांक गुप्ता यांचा प्रवास UPSC विध्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे अभ्यासाचे मुद्दे समोर आणतो.

 

अपयशाने खचू नका:-

पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी तयारी सुरु ठेवा.

 

अभ्यासक्रम समजून घ्या:-

UPSC च्या अभ्यासक्रनुसार नियोजन करा.

 

सराव महत्वाच्या:-

प्रश्नपत्रिका आणि टेस्ट सिरीज सोडवा.

 

उत्तरलेखणाचा सराव करा:-

MAINS मध्ये योग्य पद्धतीने उत्तरे लिहणे आवश्यक आहे.

 

स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा:-

अडचणी आल्या तरी ध्येय सोडू नका.

 

वेळेच नियोजन करा:-

नोकरीं आणि अभ्यास यांचा समतोल राखता येतो.

 

Revision करा:-

अभ्यास केलेल्या विषयांची नियमित उजळणी करा.

 

IAS Divyank Gupta यांच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

Divyank Gupta कोण आहेत?

दिव्यांक गुप्ता हे UPSC Civil Services Examination 2024 मध्ये AIR 22 मिळवणारे आणि 2025 बॅचचे महाराष्ट्र कॅडर IAS अधिकारी आहेत.

 

Divyank Gupta यांची जन्मतारीख काय आहे?

प्रकाशित न्यूज पेपर व न्यूज चॅनल च्या नोंदीनुसार त्यांची जन्मतारीख 10 जुलै 1998 आहे.

 

Divyank Gupta यांचे वय किती आहे?

दिव्यांक गुप्ता यांना 18 नोव्हेंबर 2026 रोजी ते 28 वर्षांचे झाले आहेत.

 

Divyank Gupta यांचे जन्मस्थान कोणते आहे?

त्यांचे जन्मस्थान उत्तर प्रदेशातील कानपुर असल्याचे समजत आहे.

 

Divyank Gupta यांनी कोणत्या कॉलेजमधून शिक्षण घेतले?

त्यांनी IIT KANPUR मधून B. TECH पूर्ण केले.

 

Divyank Gupta यांची इंजिनिअरिंग शाखा कोणती होती?

त्यांनी Chemical Engineering या शाखेत पदवी मिळवली.

 

Divyank Gupta यांची UPSC Rank किती आहे?

UPSC Civil Services Examination 2024 मध्ये त्यांनी AIR 21 मिळवली आहे.

 

Divyank Gupta यांचा UPSC Optional Subject कोणता होता?

Mathematics हा त्यांचा वैकल्पिक विषय होता.

 

Divyank Gupta आधी IPS अधिकारी होते का?

होय UPSC मधील पूर्वीच्या यशानंतर त्याची IPS सेवेत निवड झाली होती.

 

Divyank Gupta यांना कोणते IAS कॅडर मिळाले?

त्यांना महाराष्ट्र IAS कॅडर मिळाले आहे.

 

Divyank Gupta यांची IAS बॅच कोणती आहे?

त्यांची IAS बॅच 2025 आहे.

 

Divyank Gupta यांचे वडील काय करतात?

प्रकाशित मुलाखतीनुसार त्यांचे वडील कानपुरमध्ये जनरल स्टोअर चालवत होते.

 

Divyank Gupta यांनी UPSC ची तयारी कशी केली?

त्यांनी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, टेस्ट सिरीज, उत्तरलेखन, गणिताचा सराव आणि MOCK INTERVIEW यावर भर दिला.

 

Divyank Gupta यांना UPSC 2024 मध्ये किती गुण मिळाले?

त्यांना एकूण 1015 गुण मिळाले आहेत. Mains मध्ये 825 आणि Interview मध्ये 190 गुण मिळाले.

 

Divyank Gupta यांची सध्याची नियुक्ती कुठे आहे?

अव्हेलेबल 2026 सेवा नोंदीनुसार त्यांची बीड येथे Super Numerary Assistant Collector म्हणून नोंद आहे. नवीन बदली झाल्यास पद बदलू शकते.

 

निष्कर्ष (Conclusion):

IAS दिव्यांक गुप्ता यांचा प्रवास हा शिक्षण, मेहनत, सातत्य आणि ध्येयाप्रति असलेल्या समर्पनाचे उदाहरण आहे. IIT KANPUR सारख्या प्रतिष्टीत संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केलीम सुरुवातीच्या अपयशानंतर IPS सेवेत प्रवेश केला आणि त्यानंतरही IAS होण्याचे ध्येय कायम ठेवले.

 

अखेर UPSC 2024 मध्ये AIR 21 मिळवून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आणि महाराष्ट्र कॅडरमध्ये IAS अधिकारी म्हणून जगा मिळवली. त्यांचा प्रवास प्रत्येक UPSC विध्यार्थ्याला सांगतो कि, अपयश हा प्रवासाचा शेवट नसतो. योग्य नियोजन, मेहनत आणि सातत्य ठेवल्यास ध्येय गाठण्यासाठी पुन्हा प्रयत्न करता येतात. दिव्यांक गुप्ता यांची यशोगाथा म्हणजे IIT ते IPS आणि IPS ते IAS असा प्रेरणादायी प्रवास.

 

स्पेशल टीप:-

दिव्यांक यांच्या पूर्वीचा UPSC प्रयत्नाचे वर्ष आणि प्रयत्नाची संख्या वेगवेगळ्या चरित्र्यात्मक स्रोतांमध्ये विसंगत आहे. त्यामुळे लेख मध्ये त्यांची अचूक प्रयत्नसंख्या निश्चित केलेली नाही. जन्मतारीख, कुटुंब आणि काही वैयक्तिक तपशील अधिकृत DOPT नोंदीत स्वातंत्रपने प्रमाणित केलेले नाहीत.

1 thought on “Ias Divyank Gupta Biography in Marathi | AIR 21 UPSC 2024 | Education, Age, Family”

Leave a Comment