इशिता राठी IAS यांचे जीवनचरित्र, वय, जन्म, शिक्षण, UPSC AIR 8 रँक, 2022 बॅच, AGMUT केडर, कुटुंब आणि प्रशासकीय कारकीर्द

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Ishita Rathi Ias Biography लेख या लेख मध्ये तुम्हाला इशिता राठी IAS यांचे जीवनचरित्र, वय, जन्म, शिक्षण, UPSC AIR 8 रँक, 2022 बॅच, AGMUT केडर, कुटुंब आणि प्रशासकीय कारकीर्द हि सर्व माहिती आम्ही देणार आहोंत. भारतातील सर्वात प्रतिष्टीत स्पर्धा परीक्षांपैकी UPSC नागरी सेवा परीक्षा हि एक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी IAS अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेची तयारी करतात. मात्र, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर काही विद्यार्थीच परीक्षेत यशस्वी होतात.
अशाच यशस्वी उमेदवारांपैकी एक नाव म्हणजे इशिता राठी. इशिता राठी या २०२२ बॅचच्या AGMUT कॅडरच्या IAS OFFICER आहेत. त्यांनी UPSC Civil Services Examination 2021 मध्ये ऑल इंडिया रँक ८ (AIR 8) मिळवून देशभरात आपली ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही मोठ्या कोचिंग सेंटर न घेता स्व-अभ्यासाच्या माध्यमातून हे यश मिळवले. त्यांचे आई-वडील दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या प्रेररणेमुळे इशिता याना लहानपणापासूनच नागरी सेवेत जाण्याची इच्छा होती. या लेखामध्ये आपण Ishita Rathi Ias Biography in Marathi अंतर्गत त्यांचे जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, UPSC प्रवास, रँक, IAS BATCH, कॅडर आणि प्रशासकीय कारकीर्द यांची सविस्तर महती जाणून घेणार आहोत.
Ishita Rathi IAS, UPSC AIR 8, AGMUT Cadre, IAS Biography Marathi, UPSC Topper
1. इशिता राठी IAS यांची वैयक्तिक माहिती (Personal Details)
इशिता राठी या तरुण आणि प्रतिभावान IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. UPSC परीक्षेत आठवा क्रमांक मिळवल्यानंतर त्या चर्चेत आल्या. त्यांची वैयक्तिक माहिती खालीलप्रमाणे आहे:
पूर्ण नाव इशिता राठी, जन्मतारीख २० मे १९९६, वय नोव्हेंबर २०२६ नुसार ३० वर्षे, जन्मस्थान दिल्ली, गृह राज्य दिल्ली, व्यवसाय IAS OFFICER, IAS बॅच २०२२, IAS कॅडर AGMUT, UPSC परीक्षा Civil Services Examination 2021, UPSC रँक AIR ८, पदवी B.A. Economics (Hons.), पदव्युत्तर शिक्षण M.A. Economics, महाविद्यालय Lady Shri Ram College, विद्यापीठ/संस्था University of Delhi आणि Madras School of Economics, वडील दिल्ली पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल, आई दिल्ली पोलीस विभागत Assistant Sub-Inspector आहेत.
2. इशिता राठी यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन (Early Life)
इशिता राठी यांचा जन्म २० मी १९९६ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे बालपण दिल्लीमध्ये इले. त्यांचे कुटुंब शिक्षण आणि शिस्तीला महत्व देणारे आहे. त्यांचे आई-वडील दोघेही दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या आई मीनाक्षी राठी या Assistant Sub-Inspector (ASI) म्हणून कामी करतात, तर त्यांचे वडील हे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
लहानपणापासूनच इशिता यांनी आपल्या आई-वडिलांना पोलीस गणवेशात पहिले होते. त्यामुळे त्यांना सरकारी सेवेत काम करण्याची प्रेरणा मिळाला. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि, त्यांच्या आई-वडिलांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. समाजासाठी काम करण्याची इच्छा आणि प्रशासकीय सेवेमधील विविध संधी यामुळे त्यांनी IAS OFFICER होण्याचे ध्येय निश्चित केले.
3. इशिता राठी यांचे शालेय शिक्षण (School Education)
इशिता राठी यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीमधील DAV Public School, Vasant Kunj येथे पूर्ण केले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली होती. यांनी बारावीमध्ये विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले होते. त्यासोबत अर्थशास्त्र हा अतिरिक्त विषय म्हणून अभ्यासला होता.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये अर्थशास्त्र विषयाला विशेष महत्व आहे. पुढे UPSC परीक्षेची तयारी करताना आणि मुख्य परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयाची समज विकसित करण्यासाठी त्यांच्या या शिक्षणाचा उपयोग झाला.
4. इशिता राठी यांचे महाविद्यालयीन शिक्षण (Education Qualification)
इशिता राठी यांनी दिल्ली विद्यापीठाशी संलग्न Lady Shri Ram College मधून Economics विषयामध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील Madras School of Economics मधून Economics विषयात पदव्युत्तर पदवी (M.A.) प्राप्त केली.
त्यांच्या शिक्षणाचा तपशील:-
1. B.A. Economics (Hons.)
- महाविद्यालय: Lady Shri Ram College
- विद्यापीठ: University of Delhi
- विषय: Economics
2. M.A. Economics
- संस्था: Madras School of Economics
- विषय: Economics
- शिक्षण: पदव्युत्तर पदवी
अर्थशास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामुळे त्यांना भारतीय अर्थव्यवस्था, आर्थिक धोरणे, विकास आणि सामाजिक प्रश्न यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
5. UPSC परीक्षेची तयारी कशी केली? (UPSC Preparation Strategy)
इशिता राठी यांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य नियोजन महत्वाचे होते. त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणत्याही खासगी कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला मी नव्हता. त्यांनी ऑनलाईन अभ्यास साहित्य, पुस्तके, YOUTUBE वरील शैक्षणिक व्हिडिओ आणि पेपरच्या मदतीने तयारी केली. त्यांच्या अभ्यास पद्धतीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- नियमित अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे.
- NCERT आणि मूलभूत पुस्तकांवर भर देणे.
- चालू घडामोडींचा नियमित अभ्यास करणे.
- ऑनलाइन शैक्षणिक साधनांचा वापर करणे.
- UPSC मुख्य परीक्षेसाठी उत्तरलेखनाचा सराव करणे.
- नियमित मॉक टेस्ट देणे.
- सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवणे.
मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले होते की, त्या दररोज साधारण 9 ते 10 तास अभ्यास करत होत्या. त्यांनी जवळपास तीन वर्षे UPSC तयारीवर लक्ष केंद्रित केले होते.
6. इशिता राठी यांचे UPSC प्रयत्न आणि यश (UPSC Attempts)
इशिता राठी यांचा UPSC प्रवास सोपा नव्हता. त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही. त्यांनी २०१९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. मात्र, त्यांना त्या प्रयत्नात यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांच्या मुलाखतीतील गुणांमध्ये दहा गुणांची कमतरता राहिल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते.
दोन प्रयत्नामध्ये औप्याशी आले तरी त्यांनी हार मनाली नाही. त्यांनी आपल्या चुका समजून घेतल्या आणि अधिक मेहनतीने तयारी सुरु ठेवली, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी UPSC Civil Services Examination 2021 मध्ये यश मिळवले आणि संपूर्ण भारतात अथवा क्रमांक मिळवला. त्यांचा प्रवास UPSC विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
7. UPSC 2021 मध्ये AIR 8 रँक (UPSC Rank)
UPSC Civil Services Examination 2021 चा निकाल ३० मे २०२२ रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये इशिता राठी यांनी ऑल इंडिया रँक ८ (AIR 8) मिळवला. देशभरातील लाखो उमेदवारांमधून अथवा क्रमांक हि मोठी कामगिरी होती. त्यांच्या यशामुळे दिल्ली पोलीस विभागातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दिल्लेचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यांच्या आई-वडिलांनीही त्यांच्या यशामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
8. इशिता राठी यांचे कुटुंब (Family Background)
इशिता राठी यांच्या कुटुंबामध्ये शिक्षण आणि शिस्तीला महत्व दिले जाते. त्यांचे वडील दिल्ली पोलिसांमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आई मीनाक्षी राठी दिली पोलिसांमध्ये Assistant Sub-Inspector आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी पोलीस विभागात काम करताना समाजसेवेचे महत्व त्यांना समजावून सांगितले. इशिता यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मित्र आणि कुटुंबियांना दिले आहे. त्यांच्या कुटुंबात पोलीस सेवेच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना सार्वजनिक सेवेमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली.
9. इशिता राठी IAS बॅच आणि केडर (IAS Batch and Cadre)
UPSC २०२१ मध्ये यश मिळाल्यानंतर इशिता राठी यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. त्यांना २०२२ बॅचचे आयएएस अधिकारी म्हणून AGMUT कॅडर देण्यात आले. AGMUT या कॅडरचे पूर्ण नाव Arunachal Pradesh, Goa, Mizoram and Union Territories असे आहे. या कॅडरमध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि विविध केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. IAS प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकारी आपल्या नियुक्त कॅडरमध्ये विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतात. इशिता राठी यांनीदेखील AGMUT कॅडरमध्ये प्रशासकीय सेवेला सुरुवात केली.
10. IAS अधिकारी म्हणून प्रशासकीय कारकीर्द (Administrative Career)
IAS अधिकारी झाल्यानंतर इशिता राठी यांनी विविध प्रशासकीय प्रशिक्षण आणि जबाबदाऱ्यांमधून अनुभव मिळवला. त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या नियुक्त्यामध्ये जम्मू आणि काश्मीर तसेच पुदुच्चेरी येथील जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
जम्मूमधील प्रशासकीय अनुभव:-
त्यांच्या सुरुवातीच्या प्रशासकीय कारकिर्दीत जम्मू येथे उपयुक्त कार्यालयाशी सलंग जबाबदारी संभाळल्याची नोंद उपल्बध अधिकारी प्रोफाइलमध्ये आहे.
पुदुच्चेरी येथे Sub Collector:-
२१ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याची पुदुच्चेरी येथे Sub Collector (Revenue), North म्हणून नियुक्ती झाली. Sub Collector या पदावर महसूल प्रशासन, स्थानिक पातळीवरील सरकारी योजना, नागरिकांच्या तक्रारी आणि विविध प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी असते.
पुढील प्रशासकीय नियुक्त्या:-
२०२६ मध्ये पुदुच्चेरी आणि जम्मू-काश्मीरमधील प्रशासकीय बदल्याबाबद वृत्त प्रसिद्ध झाले. सप्टेंबर २०२६ मध्ये त्यांना जम्मू-काश्मीरमधील नवीन नियुक्तीसाठी पुदुच्चेरीमधून कार्यमुक्त करण्यात आल्याची बातमी होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ मधील काही अधिकारी प्रोफाइलमध्ये जम्मू येथी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा उपायुक्त स्वरावरील नियुक्तीचा उल्लेख आहे. मात्र, उपलब्ध स्त्रोतामध्ये पदनाम आणि बदलीच्या तारखांबाबत विसंगती असल्यामुळे त्यांचे अचूक सध्याचे पद अधिकृत आदेशातून तपासणे योग्य ठरेल.
11. इशिता राठी यांच्या यशामागील प्रेरणा
इशिता राठी यांचा UPSC प्रवास अनेक विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे.
- त्यांच्या यशातून काही महत्वाचे धडे मिळतात.
- पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी प्रयत्न सोडू नयेत.
- योग्य नियोजन करून अभ्यास करावा.
- कोचिंगशिवायही ऑनलाईन साधनांच्या मदतीने तयारी करता येते.
- कुटुंबाचा पाठिंबा स्वतःवरील विश्वास महत्वाचा असतो.
- सातत्य आणि मेहनत यामुळे मोठे ध्येय सध्या करता येते.
- सोशल मीडियाचा वापर अव्हासच्या दृष्टीने मर्यादित ठेवावा.
त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात मिळवलेले यश हे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्त्यांसाठी महत्वाचा प्रेरणास्रोत आहे.
इशिता राठी IAS यांच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
इशिता राठी कोण आहेत?
इशिता राठी या २०२२ बॅचच्या AGMUT कॅडरच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.
इशिता राठी यांचा UPSC रँक किती आहे?
त्यांनी त्यांनी UPSC Civil Services Examination 2021 मध्ये AIR 8 मिळवला.
इशिता राठी यांचा जन्म कधी झाला?
उपलब्ध अधिकारी प्रोफाइलनुसार इशिता राठी यांचा जन्म २० मे १९९६ रोजी झाला आहे.
इशिता राठी यांचे वय किती आहे?
इशिता राठी यांचे नोव्हेंबर २०२६ नुसार वय ३० वर्षे आहे.
इशिता राठी यांचे शिक्षण कुठे झाले?
त्यांनी Lady Shri Ram College, University of Delhi येथून Economics मध्ये पदवी आणि Madras School of Economics मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
इशिता राठी यांचे आई-वडील कोण आहेत?
त्यांचे आई-वडील दिल्ली पोलिसमध्ये कार्यरत आहेत. त्यांची आई मीनाक्षी राठी या ASI असून वडील हेड कॉन्स्टेबल आहेत.
इशिता राठी कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत?
इशिता राठी ह्या २०२२ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
इशिता राठी यांना कोणते IAS केडर मिळाले?
इशिता राठी ह्या AGMUT (Arunachal Pradesh, Goa, Mizoram and Union Territories ) कॅडर मिळाले आहे.
इशिता राठी यांनी UPSC परीक्षा कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण केली?
त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC Civil Services Examination 2021 उत्तीर्ण केली.
इशिता राठी यांनी UPSC साठी कोचिंग घेतले होते का?
नाही, त्यांची स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर आणि ऑनलाईन शैक्षणिक साधनांच्या मदतीने UPSC परीक्षेची तयारी केली.
निष्कर्ष (Conclusion):
इशिता राठी यांचा जीवनप्रवास हा मेहनत, जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत असलेल्या आई-वडिलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पहिले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या Lady Shri Ram College मधून अर्थशास्त्र विषयात पदवी आणि Madras School of Economics मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. UPSC परीक्षेच्या पहिल्या दोन प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मनाली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी संपूर्ण भारतात अथवा क्रमांक मिळवला. आज त्या २०२२ बॅचच्या AGMUT केदारच्या आयएएस अधिकारी म्हणून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या साम्भाळाय आहेत. एकंदरीत, Ishita Rathi Ias Biography हि UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी जीवनकथा आहे. त्यांच्या यशातून एक गोष्ट स्पष्ट होते कि, योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्ववरील विश्वास असेल तर कोणतेही मोठे ध्येय सध्या करता येऊ शकते.