Shobhika Pathak IAS Biography in Marathi: Age, Education, UPSC Rank, IRS to IAS Journey, AIR 37

Table of Contents

IAS Shobhika Pathak Biography in Marathi | शोभिका पाठक यांचा जीवनप्रवास, शिक्षण, UPSC AIR 37 आणि यशोगाथा

Shobhika Pathak IAS Biography in Marathi Age, Education, UPSC Rank, IRS to IAS Journey, AIR 37

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत Shobhika Pathak Ias Biography in Marathi लेख, शोभीका पाठक (Shobhika Pathak) या UPSC Civil Services Examination 2024 मध्ये संपूर्ण भारतात 37 वा क्रमांक (AIR 37) मिळणाऱ्या यशस्वी उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी UPSC ची तयारी करताना आयकर विभागात Income Tax Officer म्हणून काम केले होते. आधीच्या प्रयत्नात IRS सेवा मिळाल्यानंतरही त्यांनी IAS अधिकारी होण्याचे स्वप्न सोडले नाही आणि अखेर आपल्या शेवटच्या प्रयत्नात IAS होण्याचे ध्येय पूर्ण केले.

 

त्यांचा प्रवास हा नोकरीं सांभाळून UPSC ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या IAS Shobhika Pathak Biography in Marathi लेखमध्ये आपण त्यांचे बालपण, कुटुंब, शिक्षण, इंजिनिअरिंग, UPSC प्रवास, पहिल्या प्रयत्नातील यश, IRS सेवा, IAS होण्याचा प्रवास आणि वारंवार विचारले जानारे प्रश्न सविस्तर जानून घेणार आहोत.

 

IAS Shobhika Pathak Biography in Marathi: शोभिका पाठक यांचा जीवनप्रवास, शिक्षण, UPSC AIR 37, यशोगाथा आणि जॉइनिंग देट

 

1. शोभिका पाठक यांची वैयक्तिक माहिती

पूर्ण नाव शोभीका पाठव (Shobhika Pathak) त्यांचा व्यवसाय भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी. त्यांनी UPSC CSE परीक्षा 2024 मध्ये दिली आणि अंतिम रँक AIR 37, मागील रँक AIR 248 (2020), मागील सेवा IRS ( Income Tax), शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कुल बंगरुरू, महाविद्यालय NIT Warangal, पदवी B. Tech – Electrical And Electronics Engineering, IAS कॅडर महाराष्ट्र, IAS बॅच 2025 अशी आहे.

 

महत्वाची टीप:-

त्यांची जन्मतारीख, अचूक वय, आई-वडिलांची नावे आणि मूळ गाव याबाबत विश्वसनीय सार्वजनिक स्रोतांमध्ये पुरेशी पुष्टी मिळत नाही. त्यामुळे अप्रामाणित माहिती देणे टाळले आहे.

 

2. शोभीका पाठव यांच प्रारंभिक जीवन आणि बालपण

शोभीका पाठक यांच्या जीवनप्रावासाची सुरुवात शिक्षणाला महत्व देणाऱ्या वातावरणातून झाली. त्यांच्या शालेय शिक्षणाची माहिती Army Public School, Bengaluru अशी उपलब्ध आहे. लहानपणापासून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

 

पुढे त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. UPSC सारख्या देशातील कठीण परीक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी चिकाटी, सातत्य आणि ध्येय निश्चित ठेवण्याची वृती त्यांच्या प्रवासात दिसून येते. त्यांच्या वैयक्तिक बालपणतील घटना आणि कुटुंबाविषयी सविस्तर माहिती मात्र सर्वजनिकरित्या अव्हेलेबल नाही.

 

3. शोभीका पाठव यांचा शैक्षणिक प्रवास

शोभीका पाठक यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्वाचा टप्पा म्हणजे NIT Warangal. त्यांनी 2013 मध्ये या प्रतिष्टीत तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश घेतला.

 

शोभीका पाठक यांचा शालेय प्रवास:-

 

शाळा:-

शोभीका पाठक यांची शाळा Army Public School, Bengaluru येथे होती.

 

महाविद्यालय:-

शोभीका पाठक यांचे महाविद्यालय National Institute of Technology, Warangal, हे होते.

 

पदवी:-

शोभीका पाठक यांनी Bachelor of Technology ही पदवी घेतली आहे.

 

शाखा:-

Electrical and Electronics Engineering.

 

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केवळ खासगी क्षेत्रातील करिअरवर लक्ष केंद्रित न करता नागरी सेवेत जाण्याचे ध्येय ठेवले. त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरला.

 

4. शोभीका पाठव यांचा UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय

UPSC Civil Services Examination ही भारतातील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेमधून IAS, IPS, IFS, IRS यासारख्या सेवासाठी उमेदवारांची निवड केली जाते. शोभीका पाठक यांनीही देशाच्या प्रशासनात काम करण्यासाठी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

 

अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असतानाही त्यांनी सामान्य अध्ययन, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी आणि इतर विषयांचा अभ्यास केला. त्यांच्या तयारीतील महत्वाचा भाग म्हणजे नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्य.

 

5. शोभीका पाठव यांचा UPSC 2020 मधील पहिला मोठा यशस्वी प्रयत्न

शोभीका पाठक यांनी UPSC Civil Services Examination 2020 मध्ये यश मिळवले. या परीक्षेत त्यांनी AIR 248 – रँक UPSC 2020 मिळवला. या रँकच्या आधारे त्यांना Indian Revenue Service (IRS – Income Tax) सेवा मिळाली.

 

ही त्यांच्या आयुष्यातील मोठी उपलब्धी होती. कारण UPSC परीक्षेत यश मिळवून त्यांनी केंदर सरकारच्या सेवेत प्रवेश केला. ही त्यांच्या आयुष्यातील मोठी उपलब्धी होती. 2020 च्या अधिकृत सेवा-वाटप यादीतील नोंदीमध्ये त्यांचे नाव आणि IRS (IT) सेवा नमूद आहे.

 

6. शोभीका पाठव यांची IRS अधिकारी म्हणून कारकीर्द

UPSC 2020 मध्ये AIR 248 मिळवल्यानंतर शोभीका पाठक यांची IRS (INCOME TAX) सेवेसाठी निवड झाली. यानंतर त्यांनी आयकर विभागात अधिकारी म्हणून काम केले.

 

IRS ही केंद्र सरकारची महत्वाची नागरी सेवा आहे. या सेवेमध्ये आयकर प्रशासन, कर संकलन, करदात्यांशी संबंधित कामकाज आजी आर्थिक नियमांची अंबलबजावणी अशा जबाबदाऱ्या असतात. मात्र IRS सेवेत कान करत असतानाही त्यांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न कायम होते.त्यांनी नोकरीं आणि UPSC अभ्यास यांचा समतोल साधत पुढील परीक्षेची तयारी सुरु ठेवली.

 

7. शोभीका पाठव यांची नोकरीसोबत UPSC ची तयारी कशी केली?

शोभीका पाठक यांच्या यशामागील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नोकरी करत असतानाही अभ्यास सुरु ठेवला. Income Tax Officer म्हणून काम करताना त्यांना कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत होत्या. त्यामुळे पूर्ण वेळ अभ्यास करणे शक्य नव्हते. मात्र त्यांनी अव्हेलेबल वेळेचा योग्य वापर केला.

 

त्यांच्या अभ्यासाच्या दिनचर्येंबाबत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार:

  • 1. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी पुस्तकाचे वाचन करणे.
  • 2. दिवसभरातील कामाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे.
  • 3. संध्याकाळी घरी आल्यानंतर नोट्सचे रिव्हीजन करणे.
  • 4. चालू घडामोडीचा नियमित अभ्यास करणे.
  • 5. परीक्षेच्या तयारीमध्ये सातत्य राखणे.
  • 6. नोकरीमुळे अभ्यासासाठी कमी वेळ मिळत असतानाही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही.

 

त्यांच्या या प्रवासातून एक महत्वाचा संदेश मिळतो कि, UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी केवळ जास्त तस अभ्यास करणे पुरेसे नसते, तर अव्हेलेबल वेळेचे योग्य नियोजन करनेही आवश्यक असते.

 

8. शोभीका पाठव यांचे UPSC 2024 मध्ये ऐतिहासिक यश – AIR 37

शोभीका पाठक यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे UPSC Civil Services Examination 2024. 2020 मध्ये IRS अधिकारी झाल्यानंतरही त्यांनी IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.

 

अखेर UPSC 2024 मध्ये त्यांनी संपूर्ण भारतात 37 वा क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशामुळे त्यांना IAS सेवेत प्रवेश मिळाला. ही कामगिरी विशेष ठरली, कारण त्यांनी आधीच सरकारी सेवेत काम करत असताना पुन्हा UPSC परीक्षा दिली आणि आपल्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले.

 

9. शोभीका पाठव यांचे UPSC 2024 परीक्षेतील गुण

UPSC CSE 2024 च्या अंतिम गुणपत्रकानुसार शोभीका पाठक यांना एकूण 1002 गुण मिळाले. अंतिम गुणांची माहिती मुख्य परीक्षा (Written) मध्ये 807, मुलाखत (Interview) मध्ये 195, टोटल गुन 1002, एकूण 2025 पैकी 1002 गुण,

 

10. शोभीका पाठव यांचे वैकल्पिक विषय (Optional Subject)

UPSC मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषयाला महत्वाचे स्थान आहे. उपलब्ध Vision IAS च्या माहितीनुसात शोभीका पाठक यांनी Economics (अर्थशास्त्र) हा वैकल्पिक विषय निवडला होता.

 

अर्थशास्त्र या विषयामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, महागाई, बेरोजगारी, वित्तीय धोरण आणि आर्थिक संकल्पना यांचा अभ्यास करावा लागतो. अर्थशास्त्राची आवड असलेल्या विध्यार्थ्यांसाथी त्यांचा अभ्यासप्रवास समजून घेणे उपयुक्त ठरू शकते.

 

11. शोभीका पाठव यांना IAS अधिकारी म्हणून महाराष्ट्र कॅडर

UPSC 2024 मध्ये AIR 37 मिळवल्यानंतर शोभीका पाठक यांची IAS सेवेसाठी निवड झाली. उपलब्ध अधिकारी प्रोफाइलनुसार त्यांची 2025 बचमध्ये महाराष्ट्र कॅडरसाठी नोंद आहे. महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांचा प्रशासकीय सेवेत पुढील प्रवास सुरु झाला.

 

IAS अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासन, महसूल विकास, विकास योजना, सरकारी योजनाची अंबलबजावणी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याशी संबंधित विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. नोव्हेंबर 2026 मध्ये उपलब्ध असलेल्या IAS रडार प्रोफाइलनुसार त्यांची वर्धा येथे Super Numerary Assistant Collector म्हणून नोंद आहे.

 

12. शोभिका पाठक यांच्या यशामागील महत्त्वाचे घटक

त्यांच्या UPSC प्रवासाचा अभ्यास केल्यास काही महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात.

  • 1. स्पष्ट ध्येय: IRS अधिकारी झाल्यानंतरही IAS होण्याचे स्वप्न कायम ठेवले.
  • 2. वेळेचे नियोजन: नोकरीसोबत अभ्यासाठी वेळ काढला.
  • 3. सत्यात: व्यस्त दिनक्रमताही अभ्यास सुरु ठेवला.
  • 4. योग्य रणनीती: Prelims, Mains आणि Interview या तिन्ही टप्प्प्याची तयारी केली.
  • 5. आत्मविश्वास: आधीच्या यशावर थांबून न राहता पुढील ध्येयासाठी प्रयत्न केले.
  • 6. चिकाटी: कठीण परिस्थितीतही त्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवला.

 

Vision IAS च्या मुलाखतीमध्ये त्यांनी Economics, Current Affairs, Answer Writing, Mock Tests आणि Previous Year Questions यांच्या तयारीविषयी मार्गदर्शन केले आहे.

 

13. UPSC विद्यार्थ्यांसाठी शोभीका पाठव यांच्या प्रवासातून मिळणारी प्रेरणा

शोभीका यांची यशोगाथा प्रत्येक UPSC विध्यार्थ्याला एक महत्वाचा संदेश देते. UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी एकदाच प्रयत्न करून थांबने आवश्यक नाही. आपले ध्येय मोठे असेल, तर त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यांनी 2020 मध्ये IRS सेवा मिळवली. मात्र त्यांचे अंतिम ध्येय IAS अधिकारी होण्याचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सांभाळून पुन्हा तयारी केली आणि 2024 मध्ये AIR 37 मिळवली. विशेषत: नोकरी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

 

त्यांच्या यशोगाथातून पुढील गोष्टी शिकता येतात:

  1. अपयश किंवा अपेक्षित यश न मिळाल्यास निराश होऊ नये.
  2. प्रत्येक प्रयत्नातून स्वतःच्या चुका सुधाराव्यात.
  3. अभ्यासाचे नियोजन करावे.
  4. नियमित सराव आणि उजळणी करावी.
  5. स्वतःच्या ध्येयवर विश्वास ठेवावा.

 

शोभीका पाठक यांचा प्रवास म्हणजे स्वप्न, मेहनत, संयम आणि सातत्य यांच्या जोरावर ध्येय गाठण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.

 

Shobhika Pathak IAS यांच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

 

शोभिका पाठक कोण आहेत?

शोभीका पाठक या UPSC Civil Services Examination 2024 मध्ये AIR 37 मिळवणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.

 

शोभिका पाठक यांनी UPSC 2024 मध्ये कितवा क्रमांक मिळवला?

त्यांनी संपूर्ण भारतात 37 वा क्रमांक (AIR 37) मिळवला.

 

शोभिका पाठक यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा कधी पास केली?

त्यांनी UPSC Civil Services Examination 2020 मध्ये AIR 248 मिळवला.

 

UPSC 2020 मध्ये त्यांना कोणती सेवा मिळाली होती?

त्यांना IRS (INCOME TAX) सेवा मिळाली होती.

 

शोभिका पाठक यांचे शिक्षण कुठे झाले?

त्यांचे शालेय शिक्षण Army Public School, Bengaluru येथे झाले आणि त्यांनी NIT WARANGAL मधून B.Tech पूर्ण केले.

 

शोभिका पाठक यांनी कोणत्या वर्षी NIT Warangal मध्ये प्रवेश घेतला?

अव्हेलेबल वृतानुसार त्यांनी 2013 मध्ये NIT WARANGAL मध्ये प्रवेश घेतला.

 

शोभिका पाठक यांनी UPSC 2024 मध्ये किती गुण मिळवले?

त्यांना मुख्य परीक्षेत 807 आणि मुलाखतीत 195 असे एकूण 1002 गुण मिळाले.

 

त्यांचा UPSC Optional Subject कोणता होता?

अव्हेलेबल VISION IAS माहितीनुसार इकॉनॉमिक हा त्यांचा वैकल्पिक विषय होता.

 

शोभिका पाठक यांनी UPSC ची तयारी नोकरी करताना केली का?

होय, त्यांनी INCOME TAX OFFICER म्हणूं काम करत असताना UPSC ची तयारी सुरु ठेवली.

 

शोभिका पाठक कोणत्या IAS बॅचच्या अधिकारी आहेत?

अव्हेलेबल अधिकारी प्रोफाइलनुसार त्या 2025 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.

 

शोभिका पाठक यांचे IAS कॅडर कोणते आहे?

शोभीका पाठव यांचे IAS कॅडर महाराष्ट्र आहे.

 

शोभिका पाठक यांचे मूळ गाव कोणते आहे?

त्यांच्या मूळ गावाबाबत सार्वजनिक स्रोतांमध्ये एकसामान आणि पुरेशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. एका अधिकारी प्रोफाइलमध्ये बिहारचा उल्लेख आहे.

 

शोभिका पाठक यांची जन्मतारीख आणि वय किती आहे?

त्यांची अचूक जन्मतारीख आणि वय यांची विश्वसनीय सार्वजनिक पुष्टी अव्हेलेबल नाही.

 

नोव्हेंबर 2026 मध्ये शोभिका पाठक यांची पोस्टिंग कुठे आहे?

अव्हेलेबल IAS RADAR प्रोफाइलनुसार त्यांची वर्धा येथे Super Numerary Assistant Collector म्हणून नोंद आहे.

 

निष्कर्ष (Conclusion):

शोभीका पाठक यांची यशोगाथा आपल्याला शिकवते कि आयुष्यात एकदा यश मिळाले तरी मोठे ध्येय गाठाण्यासाठी प्रयत्न थांबवायचे नसतात. 2020 मध्ये IRS अधिकारी बनल्यानंतर त्यांनी IAS होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आणि 2024 मध्ये AIR 37 मिळवून ते पूर्ण केले. त्यांचा प्रवास UPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Comment